Loading...
Loading...

एका आजीला स्वतःच्या बालपणातले दिवस आठवतात, जेव्हा घरी महिलेच्या नशिबी चूल आणि मूल हेच काम असायचे. तिच्याशी नशिबी असेच भोग आले. आता जेव्हा त्यांची सून आई होणार असते, तेव्हा तिला मुलगी तर होणार नाही ना आणि झाली तर कसं होणार अशा चिंतेने आजीबाई त्रस्त असतात. अशा वेळी एक अंगणवाडी ताई त्यांना भेटते आणि त्यांच्या संवादातून आजीपुढील चिंतेचे मळभ निघून जाते आणि नवी आशा पल्लवित होते. लेक लाडकी योजनेचा सांगावा आजीला नवी उमेद मिळवून देतो. संवेदनशील आजीला विचारांची नवी दिशाही मिळून जाते. समाजातील अशा अनेक आजींचे प्रतिनिधित्व करणारी ही गोष्ट, लेक लाडकी योजनेचं वेगळेपण अधोरेखित करुन जाते.
No transcript available for this episode.
लेक लाडकी